1892 साली भारतीय जनतेने जात पात धर्म न पाळता हुकमी इंग्रज शासना विरुध्द एकत्रित करणे हेतू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सव स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली. लोकांनी एकत्र यावे आणि एकोपा आणि आनंदाने हा सण साजरा करत विविधतेतील एकता सिद्ध करावी हा त्या मागचा हेतू होता . ज्याची गरज तेव्हाही होती आणि आज त्याहूनही ही अधिक आहे.
विविधतेतील एकता जो ह्या देशा चा जीव की प्राण होता , तो,जात पात न जुमानता, धर्म व्यवस्थानेच सिद्ध आत्मरूप संजीवनी ढोल ताशांच्या त्या सुरात समरस होत भारत रुपी शरीरात पुनश्च प्राण फुंकत ,अखंड भारत निर्मितीला सुरुवात करूया…एक असा भारत ज्याची तिन्ही लोकीच काय , जगाच्या पाठीवर फक्त भारताकडूनच अपेक्षा आहे . अश्या भारतवर्षाची नवनिर्मिती निमित्त गणेश उत्सव ,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम नवभारत निर्मिती चाच. श्री गणेशाय करूया .